पुराकविना गणनाप्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा
अद्यापि तद्तुल्यकवेरभावात्, अनामिका सार्थवति बभूव
असं ज्याचं वर्णन केलं जातं असा कालिदास आणि मंदाक्रांता वृत्तामधलं त्याचं काव्य मेघदूत ह्याबद्दल माधव ज्युलियन म्हणतात -
मेघांनी हे, गगन भरता, गाढ आषाढमासि
होई पर्युत्सुक विकल तो, कांत एकांतवासी
तन्नि:श्वास, श्रवुनि रिझवी, कोण त्याच्या जिवासी
मंदाक्रांता, सरस कविता, कालिदासी विलासी
मेघदूताबद्दल फार ऐकून होतो. असही वाचलंय कि कालिदास हा हवामानशास्त्रज्ञ होता आणि मेघदूतामध्ये यक्ष त्या ढगाला ज्या रस्त्याने जायला सांगतो, 'इथे आलास कि खाली उतर,विश्रांती घे', 'तू इतक्या काळानंतर इथे असशील, तिथे अशी दृश्ये असतील' वगैरे जे वर्णन आहे तो मान्सूनच्या वाऱ्यांचे प्रवाह आणि मार्ग याप्रमाणे आहे. त्यामुळे देखील मेघदूत वाचण्याची फार इच्छा होती. (मध्ये पेपर मध्ये बातमी होती कि 'प्रोजेक्ट मेघदूत' ह्या नावाने मेघदूताप्रमाणे मान्सूनची प्रगती तपासण्यासाठी एक प्रकल्प सुरु केला आहे म्हणून. पण त्याच पुढे काय झाल माहिती नाही.)
मागच्या वर्षी गप्पांच्या ओघात विषय निघाला आणि मग शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेलं मेघदूताचं पुस्तक रसिकाने मला भेट म्हणून दिलं. तिने ते पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं होतं त्यामुळे घरी जाउन आल्यानंतर मी ते अधाश्यासारखं वाचून काढलं. अप्रतिम आहे!
हा अनुवाद वाचण्याआधी संस्कृतमधील चरण वाचून थोड्याफार प्रमाणात मेघदूत वाचलं होतं. गाडगीळ सर आणि जोशी बाई ह्यांच्या शिकवण्यामुळे माझ्या अल्पमतिला थोडफार कळलंहि होतं. अनुवाद वाचून खूपच खूश झालो. आज दुपारी इच्छा झाली म्हणून काही कडव्यांचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. नीट कळले नाही तिथे इंग्रजी व मराठीमधिल अनुवाद वाचले. (शब्दधातुरुपावलि घेऊन बसलो तर ह्या इतर अनुवादांची मदत घ्यावी लागणार नाही बहुतेक).
हा अनुवाद अगदी प्रत्येक श्लोकाप्रमाणे आहे असे नाही. तसेच हा स्वैर भावानुवाद आहे. 'साधारणपणे तसं' वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी वृत्त अगदी नेमकेपणाने जमले नसले, तरी शब्दांचा उच्चार ते वृत्तात बसवण्यासाठी म्हणून त्या लयीत केला तर बसतात. मेघदूताच्या पहिल्या १३ कडव्यांचे रुपांतर आज केलं आहे.
तुम्हा सर्वांना हा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.
इथे ह्याचे recording ऐकता येईल. चिन्मयने ह्या video साठी मदत केली.
पूर्वमेघ
सेवेमध्ये, धनपतिच्या, जाहली का कसूर
एकांताचा, सहा ऋतूंचा, शाप यक्षास क्रूर
वृक्षाच्छादित, रामगिरीते, भोगितो शाप दूर
सीतास्नाने, पावन असे, जेथले ताल-नीर ।।१।।
पत्नीविरहे, दुःखमग्न, वाळला तो अतीव
महिने काही, व्यतित करिता, निखळले बाहुबंद
आषाढाच्या, दिवशी पहिल्या, पाहतो कृष्णमेघ
(जणू) गज मदाने, क्रीडा करी, माजुनि मस्त एक ।।२।।
दर्शन ज्याचे, लावी पिसे, धुंद प्रणयी जनांस
दुःखाsवेगे, हतबल होई, कौतुके पाही त्यास
रोखुनी अश्रू, मिटुनी डोळे, घेतसे खोल श्वास
आठव येता, प्रियबाहुंचा, जाहला तो उदास ।।३।।
उत्तरदिशी, गमन करितो, जाणुनी नीलमेघ
क्षेमकुशल, प्रिये कळविण्या, कल्पना ये मनात
निर्जीव ढग तो, निरोप कथण्या, सर्वथा असमर्थ
(हे) नुरले भान, वाहून फुले, यक्ष वदला घनास ।।४।।
पुष्कराच्या, महासारसि, जन्म झाला तयाचा
देवेन्द्राचा, प्रिय सेवक तू, शांतवी तप्तभूला
पाहुनी तुला, अतिआनन्दे, सुस्वरे गाती ललना
ऐशा घना, नमन करुनी, विनवितो मी तयाला ।।५।।
कुबेरशापे, वनवासी मी, लोटले चार मास
प्रणयार्ता ती, प्रिया माझी, दीन कष्टी उदास
शिवशम्भूच्या, चन्द्रप्रकाशे, उजळते जी झकास
ऐशा अलका-नगरी जाउनि, सांगशी का निरोप? ।।६।।
वाटेमध्ये, भेटतील तुज, चातक आणि बगळे
पाहुनी तुला, विरहयातना, विसरती पथिक सगळे
गडगडाटे, बीजांकुर ते, उमलती धरतिवरती
घेउनि कमळे, हंस सोबती, परतति मानसरसि ।।७।।
श्रीरामाच्या, पदकमलांनी, जाहला जो पवित्र
भेटीअंति, रामगिरीच्या, जो तुझा प्रिय मित्र
आलिंगुनी त्या, गिरीशिखरांना, मार्ग क्रमसि पुनश्च
तव अश्रूंचा, कर वर्षाव, भेट होता पुनश्च ।।८।।
मार्ग तयाला, देतो आखून, त्वरित तव सुप्रयाणा
विश्रांतीस्तव, गिरिशिखरे अन्, निर्झरे नीरपाना
हे जलदा तू, जलद जाउनि, सांग माझ्या सखिला
कर आश्वस्त, प्रियभार्येला, कळवुनि क्षेमकुशला ।।९।।
मेघदूताची पहिली १० कडवी व त्यांचा इंग्रजी अनुवाद इथे : http://www.youtube.com/watch?v=uHqm5b1tdXA व पुढील १० कडवी व त्यांचा इंग्रजी अनुवाद इथे: http://www.youtube.com/watch?v=cbpXLAa7glY मिळेल.
मेघदूत : स्वैर भावानुवाद २ ची link: http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/02/10-meghadoot-2.html

No comments:
Post a Comment