आज संध्याकाळी मस्त वातावरण होतं. त्यावेळी मेघदूताच्या पुढच्या ९ कडव्यांचा हा भावानुवाद केला आहे. मूळ काव्य कडवे क्र १४ ते २२.
ता. क.- मावशीकडून आत्ताच अशी बातमी मिळाली कि 'प्रोजेक्ट मेघदूत' वाले लोक (मयुरेश प्रभुणे त्यांचे leader आहेत) मागच्या वर्षी मध्यप्रदेशापर्यंत जाउन आले. आता ह्यावेळी सौराष्ट्राच्या दिशेला जाणार आहेत.
(पूर्वमेघ)
तू वाऱ्यावर, आरूढ होता, चकित सिद्धांगना त्या
पर्वतशिखरच, उडते काय?, भासते लोचनांना
उत्तरमार्गी, ओलांडून जा, जमीन बांबूवनांची
शीघ्रगती परी, धडक टाळ बघ, स्वर्गधारी गजांची ।।१०।।
इंद्रधनुष्य, दिसेल मनुजा, असता रविप्रकाश
वारुळातुनि, बाहेर येई, (जणू) मणि-(रत्न)खड्यांचा प्रकाश
तुझी सावळी, काया उजळे, सप्तरंगात साजे
मोरपीस जणू, श्रीकृष्णाच्या, मस्तकावर विराजे ।।११।।
तुझ्या कृपेने, पिकते धान्य, जाणुनी हे मनात
कृषकपत्नी, होति आतुर, पाहण्या तुज नभात
नांगरणीने, आसुसलेली, शांतवून जमीन
उत्तरेस जा, पुनरपि वेगे, पश्चिमेस वळून ।।१२।।
विश्रांती घे, आम्रकूटी, दमशील अतिप्रवासे
विझविसी वणवे, स्मरतो मनी, होई टेकू तयाते
उपकारांचे, अधमानेही, स्मरण नेहमी करावे
उच्च कूळ मग, आम्रकूटाचे, काय वर्णन करावे? ।।१३।।
स्वागत तुझे, करी सुगंधे, मित्र तव आम्रकूट
पक्व-गर्द, आमराईंचे, शुभ्र पर्वत-उतार
स्थिरावता तू, पर्वतशिखरी, दृश्य गमले झकास
हेवा वाटे, अप्सरांना, पाहुनी (तो) भू-उरोज ।।१४।।
भिल्लीणिन्च्या, आश्रयरानि, पळभरी वृष्टी करशी
पर्जन्याने, रिता होऊनी, मग कसा वेगे पळशी
विन्ध्यतळाशी, खडकांमधुनी, वाहते नर्मदा कि
जणू हत्तींच्या, अंगावरती, रेखिली शुभ्र नक्षी ।।१५।।
हत्तींच्या क्रीडेने जिचे, पाणी गंधीत होई
जिस पिकलेल्या, जांभूळराया, अडविति ठाई ठाई
ऐशा नदीचे, प्राशिता जळ तू, पवन नच रोखी तुजला
गौण ठरते, इथे रिते अन्, मान्यता पूर्णतेला ।।१६।।
कळ्या कोवळ्या, खाती हरणे, डोलति अलि सुपुष्पी
पाउस गंधित, करे तप्तभू, (जी) हुंगिती मत्त हत्ती
तुझ्या स्वागता-साठीचा तो, ऐकुनि मयुर-आरव
अवघड होईल, निघणे तुझे, दाटुनि येती भाव ।।१७।।
मेघदूत : स्वैर भावानुवाद १ ची link : http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/02/9-1.html

No comments:
Post a Comment