Sunday, March 21, 2021

40. MPSC चे नवीन स्वरूप आणि आगामी २१ अपेक्षित ची झलक

 नमस्कार आपण वाचत आहेत आमचे लोकप्रिय सदर ‘ काय सांगशील कांद्या ! ’ 

आमच्या अविश्वसनीय सूत्रांकडून आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आपण सर्वांनी ‘MPSC’ परीक्षा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयावर जो राग व्यक्त केला आणि जे मोर्चे निघाले ते सर्व उगाचच झाले असे आता लक्षात येत आहे. बर्याच लोकांनी ‘बाकीच्या परीक्षा होऊ शकतात, लहान मुलांच्या शाळांना परवानगी मिळू शकते तर MPSC ला का नाही?’ असा सवाल विचारल्या गेल्या आहे. त्याला अनुसरून सूत्राच्या हवाल्याने आम्ही मोठा खुलासा करत आहोत.


तर मूळ गोश्ट असी आहे कि MPSC परीक्षेचे स्वरूप आता बदलण्यात येणार आहे. अजून अधिक कार्यक्षम अधिकारी शोधण्यासाठी मंत्री निल केसखूप यांनी केलेल्या सूचनेनुसार MPSC चे स्वरूप अजून बदल्यात येणार आहे. हे सावरूप कसे असेल याबद्दल आमच्या सूत्राने सांगितले आहे. लेखी आणि तोंडीपरीक्षेच्या स्वरूपातील बदला संदर्भात मिसळ खाता खाता केलेल्या संभाषणाने काहीसरमिसळ झाली असली तरी आम्हाला आलेल्या त्यासंदर्भाने आलेल्याकल्पनेनुसार लवकरच  अपेक्षितदेखील येणार आहे. पाहूया त्याची एक झलक. काही प्रश्न थेट कामाशी संबंधित नसले तरी special जनरल नॉलेज चेक करण्यासाठी विचारल्या असू शकतात. 


पहिला मोठा बदल म्हणजे काही प्रकारचे गणित परीक्षेत विचारालये जाऊ शकते. हे गणित लेखी परीक्षेत किंवा तोंडी परीक्षेत विचारले देखील जाऊ शकते. लेखी परीक्षेत जरी इचारलं तरी हे गणित तोंडीच सोडवता आले पाहिजे.


दिलेल्या माहितीनुसार त्रैराशिक मांडा आणि उत्तर सांगा. काही माहिती अपुरी असल्यास उत्तर काढतानाची तुमची गृहीतकेही सांगा.

दिलेली माहिती : मुंबईमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये तर 

  • चाय बिकसूट पत्रकारांना महिन्याला बिस्किटे किती ?

  • पावसात भिजणाऱ्या आधारवडाला पाने किती ?

  • २०२४ च्या इलेक्शन (निवडणुक) मध्ये संपत्ती दाखवताना १० एकरात किती उत्पन्न येईल ?

  • 17 वर्षे निलंबित अधिकाऱ्याकडे गाड्या किती ? 

  • संपूर्ण महाराष्ट्रातून ‘वर्षा’ला किती ?



खालील पैकी कोणत्या प्रकरणांचा तुम्ही तपास कराल किंवा नाही आणि का हे स्पष्टीकरणासह सांगा / लिहा. कोणत्या केसेस मध्ये आत्महत्या असे लिहून तपास थांबवता येईल हे लिहिणाऱ्यास बोनस मार्क.  

  • एका अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू   

  • साधूंची जमावाकडून हत्या 

  • राकाँ च्या नेत्याने नागरिकांना घरी नेऊन मारले 

  • सेलेब्रेटींनी ट्विट केले   



तोंडी पैरीक्षेनंतर एखादी विशेष प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा असू शकते. 

  • कोणाला कळू ना देता PPE  किट घालून जिलेटीनच्या कांड्या कश्या ठेवाव्यात 

  • खोलीचे तापमान असे अड्जस्ट करून दाखवा कि नाचणाऱ्या मुलींना उकडले पाहिजे 



महत्वाची (विणकामाची नाही) टीप: 

सध्याच्या वृत्तपत्रांच्या / TV वरील / online बातम्यांच्या उसंडु आणि वाक्ये तयार करण्याच्या पद्धती बघता आम्हाला जितके जमले तितके केला आहे. २१ अपेक्षित साठी आणि हे सर्व पेपरात छापून येण्यासाठी अजून किल्ष्ट, चुकीची आणि अशुद्ध लिहिणार्याची आम्हाला गरज आहे. ईच्छूकांनि समर्पक साधावा.