Saturday, October 19, 2013

23. घन घन माला नभी दाटल्या

आज थोडं काम होतं म्हणून lab मधे गेलो होतो. काम संपवून निघालो. SBS च्या मागच्या बस थांब्यावर वर बसची वाट बघत थांबलो होतो. NTU मधे अंतर्गत बससेवा आहे. पण शनिवारी आणि रविवारी अगदीच बंडलपणा असतो. भयंकर ऊन होतं, म्हणून मन चालत जायला नको म्हणत होतं. बराच वेळ वाट बघितली पण बस काही येईना म्हणून शेवटी कंटाळून चालत निघालो. SBS ची इमारत आणि प्रांगण ओलांडून TCT जवळ येईपर्यंत उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. तिथून पुढे student services center पर्यंत येईस्तोवर थोडे थोडे ढग जमा होऊ लागले होते आणि वाऱ्याच्या हलकाश्या झुळूकींनी वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं. SSC च्या पुढे ADM च्या चौकापर्यंत रस्ता नागमोडी आहे आणि उतार आहे आणि तिथून पुढे परत graduate hall पर्यंत थोडा उतार आहे. ह्या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा ओळीने झाडे आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावर नेहमीच थोडी सावली असते आणि हवेत थोडासा गारवा असतो. ह्या रस्त्यावरून मी नेहमीच रात्रीच्या चांदण्यात फिरतो (एकटाच! - lab मधून परत येताना मोठ्यांदी गाणी म्हणत येतो :-p). ADM च्या चौकात आलो तेव्हा आकाश अगदी काळंकुट्ट झालं होतं आणि मस्त वारा सुटला होता. इतका छान वातावरण होतं. एखाद्या ट्रेक साठी अगदी सुयोग्य! मिलिंद इंगळेच्या "गारवा" गाण्याच्या आधी जसं वर्णन आहे अगदी तसं झालं हे.. तिथून भराभरा चालत canteen ११ मधे शिरलो. तिथे mango lassi घेतली आणि graduate hall मधे रूमवर आलो. दार उघडून आत शिरलो आणि जोराचा पाउस सुरु झाला. अगदी एका मिनिटाच्या फरकाने वाचलो! आत्ता जवळजवळ पाऊन तास चालू होता जोरदार पाउस. मस्तपैकी mango lassi पीत माझ्या आवडीचं गाणं (घन घन माला नभी दाटल्या) ऐकत खिडकीपाशी बसलो होतो एवढा वेळ!