Sunday, November 17, 2013

24.आमचा ब्लॉग: गेल्या एक वर्षातील लिखाणाचा आढावा




आमचा ब्लॉग: गेल्या एक वर्षातील लिखाणाचा आढावा

 सुमेध ढबू
 

Abstract


  आम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात केली त्याला आज तिथीनुसार (कार्तिकी पौर्णिमा) एक वर्ष झालं. त्यानिमित्त आजची हि post. ह्या post मध्ये आम्ही आमच्या मागच्या एक वर्षातील लिखाणाचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. (नेहमीप्रमाणेच शुद्धलेखनाच्या चुकांबाबत चूकभूल देणे घेणे.)

1. INTRODUCTION

तर आम्ही ब्लॉग लिहायला लागलो त्याला आज एक वर्ष झालं! मागच्या कार्तिकी पौर्णिमेला पहिली post टाकली होती. त्यानंतर अधून मधून काहीतरी लिहित राहिलो आणि आज बघता बघता एक वर्ष झालं पण! मधल्या काळात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं आहे. (अर्थात जाणारच म्हणा.. इथे सिंगापुरात सारखाच इतका पाउस पडतो कि पुलाखालून काय पुलावरूनसुद्धा भरपूर पाणी वाहून जाईल.. पण नाही जात! इथली गटारे फारच चांगली आहेत बुवा! असो..)    

2. MAIN TEXT

खरं सांगायचं तर आज तसं लिहीण्यासारखं विशेष काही नाहीये. पण ते एक वर्ष झाल्याचं काहीतरी दाखवायला पाहिजे ना, म्हणून हा लेखनप्रपंच! नाही म्हणायला अर्धवट लिहिलेल्या गोष्टींपैकी काहीतरी पूर्ण करू शकलो असतो. पण आत्ता बाहेर वातावरण असं आहे कि काहीच करायची इच्छा होत नाहीये. सुयोगच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या मांजरासारखं चारही तंगड्या वर कर करून लोळत पडावसं वाटतंय. :-D

इकडे (सिंगापुरी) आल्यानंतर सुरु केलेलं आमचं अनियतकालिक सिंगापूर पत्रक वाचकांच्या पसंतीस पडल्यानंतर आम्ही हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तसे आम्ही आळशी असलो तरी गेल्या वर्षभरात आम्ही २३ posts टाकल्या आहेत! काही posts ह्या अश्याच मनात आलं म्हणून लिहिल्या होत्या, परिस्थितीजन्य होत्या, तर काही posts विशिष्ठ हेतूने. काही posts विनोदी होत्या, तर काही नव्हत्या. काही गद्य होत्या तर काही पद्य (कविता किंवा कवितेचे/गाण्याचे विडंबन) होत्या. बहुतांश posts मराठीमध्ये आहेत. पण - posts इतर भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) पण आहेत. थोडक्यात काय तर आम्ही आमच्या लिखाणात विविधता आणण्याचा थोडा थोडा प्रयत्न केला आहे. ठिकठिकाणी लिखाणाला जमेल तिथे वेगळा बाज आणायचा प्रयत्न केला आहे हे आमच्या चतुर, चाणाक्ष इत्यादी इत्यादी वाचकांच्या लक्षात आले असेलच! (आता हेच पहा.. हि post IEEE पेपर च्या formatting प्रमाणे लिहिली आहे..) आमच्या पहिल्याच post मध्ये आम्ही आमच्या ब्लॉगसंदर्भात स्वयंपाकाची उपमा वापरली होती. तीच उपमा पुढे न्यायची झाली तर आम्ही वेगवेगळ्या पाककृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणास त्या आवडतील अशी आशा आहे.

बाकी आमच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर विशेष काही नाही.. वर्षभरात अनेक नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. काही farewell झाली. भरपूर timepass केला. थोडंफार कामही केलं. इकडे दिवाळी साजरी केली. आमचा flat सोडून आम्ही सगळे आता पुन्हा होस्टेलमध्ये राहायला आलो आहोत त्यामुळे सध्या स्वयंपाक बंद आहे. बाकी आमच्या काही वाचकांना लौकरच प्रत्यक्ष भेटीनच! बाकीच्यांना इथेच नमस्कार!   

आता एवढं लिखाण बास झालं. आता pool खेळायला जायचं आहे. :-p :-D अर्थात मन मात्र आतून ओरडतय- “गाढवा! खेळायला काय जातोस. आजचाही दिवस वाया गेला. गेल्या २-३ दिवसात काहीच काम झालं नाहिये. नुसताच timepass!” पण माझ्या मना बन दगड! चल pool खेळायला!  

3. future work

सध्या काही काही गोष्टी अर्धवट लिहिलेल्या अवस्थेत आहेत. उदा: एका इंग्रजी गोष्टीचे रुपांतर करत होतो ते, एक विडंबन अश्या २-३ गोष्टी अर्धवट आहेत. मेघदूताच्या पहिल्या काही श्लोकांचा समश्लोकी भावानुवाद करून ब्लॉगवर टाकला होता, आता उर्वरित भागही पूर्ण करण्याचा विचार आहे. सध्या फारश्या प्रचलित नसलेल्या (पण पूर्वी सर्रास वापरल्या जाणाऱ्या) मराठी शब्दांची यादी करायला सुरुवात केली होती. ते काम पण करायचं आहे. आमच्या कंबोडिया तरीप बद्दलही लिहाव असा विचार चालू आहे. बघुयात कितपत लिखाण होतंय ते.


Acknowledgements

सर्व वाचकांना धन्यवाद! आमच्या पहिल्याच post ला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन लिहित राहून ब्लॉगवर टाकायाचा धीर झाला.

References

[] आमचाच ब्लॉग!
(सगळीकडे आमच्या विविध posts चे क्रमांक द्यायचा मोह आवरला आहे. स्वतःच्याच ब्लॉगबद्दल स्वतःच किती लिहायचं ना.. जी काही थोडीफार लोकं वाचतात ती पण वाचणं बंद करतील.. :-p)