He was alone. His thirty friends were
standing nearby and were watching, but they were of no use. His two enemies
were armed. He was not. They were determined to destroy him completely. In the
morning, one of them had attempted to kill him and was only partly successful. So
now, in the evening he had returned with an accomplice. The situation was totally
against him. Still he fought. They used all the available weapons! Finally, with
lot of efforts they killed him. The blood was everywhere.
I witnessed all this without any
word. Pieces of his shredded body were lying in front of me. It was a really
brave deed to fight with two armed and experienced professionals. Suddenly I was
very proud of him. He was my companion. However now he had started troubling
me. He had become extremely notorious. It had become necessary to get rid of him.
It was best to let the professionals do it. I sighed. They had picked up all
his body parts and had stuffed those in a bag.
I took that bag, handed over to them their
dues and stepped out of the dental clinic.
------------------------------------------------------------------------------------------
तो एकटाच होता. ते दोघे
होते. तसे त्याचे तीसेक साथीदार तिथेच उभे होते, पण ते काही कामाचे नव्हते. ते
दोघेही शस्त्रसज्ज होते. तो नि:शस्त्र होता, हतबल होता. त्यांनी त्याला समूळ नष्ट
करण्याचा चंगच बांधला होता. सकाळी त्या दोघांपैकी एकाने त्याला उडवण्याचा
अर्धयशस्वी प्रयत्न केला होता. संध्याकाळी त्याने त्याच्या साथीदाराला देखील
बोलावून घेतलं. आधीच विषम असलेला तो सामना आता अधिकच विषम झाला होता. तरीही त्याने
निकराची झुंज दिली. कुदळ आणि पहार सोडून बाकी सगळी शस्त्रे वापरून झाली! अखेर बराच
वेळ खटपट करून त्यांनी त्याच्या खांडोळ्या उडवल्या! रक्ताने शेजारचा खड्डा भरून
गेला.
मी ह्या
सर्व प्रकारचा मूक साक्षीदार होतो. आता त्याचे छिन्नविछिन्न झालेले कलेवर माझ्यासमोर
पडले होते. दोन शस्त्रसज्ज आणि अनुभवी इसमांना असं झुंजवण म्हणजे काही साधी गोष्ट
नव्हे. मला त्याचा अभिमान वाटला. गेली काही वर्षे तो माझं साथीदार होता. पण आता तो
मला तापदायक ठरू लागला होता. तो वाकड्यात शिरला होता. त्याचा समूळ नाश करणं आवश्यक
झालं होतं. मीच त्यांना त्याची सुपारी दिली होती! मी एक दीर्घ उसासा टाकला.
त्यांनी त्याचे तुकडे गोळा करून एका पिशवीत भरले.
त्या दोघांचे पैसे चुकते
करून, ती पिशवी घेऊन मी दातांच्या दवाखान्यातून बाहेर पडलो.
No comments:
Post a Comment