आज थोडं काम होतं म्हणून lab मधे गेलो होतो. काम संपवून निघालो. SBS च्या
मागच्या बस थांब्यावर वर बसची वाट बघत थांबलो होतो. NTU मधे अंतर्गत बससेवा आहे.
पण शनिवारी आणि रविवारी अगदीच बंडलपणा असतो. भयंकर ऊन होतं, म्हणून मन चालत जायला
नको म्हणत होतं. बराच वेळ वाट बघितली पण बस काही येईना म्हणून शेवटी कंटाळून चालत
निघालो. SBS ची इमारत आणि प्रांगण ओलांडून TCT जवळ येईपर्यंत उन्हाची तीव्रता थोडी
कमी झाली होती. तिथून पुढे student services center पर्यंत येईस्तोवर थोडे थोडे ढग
जमा होऊ लागले होते आणि वाऱ्याच्या हलकाश्या झुळूकींनी वातावरण एकदम प्रसन्न झालं
होतं. SSC च्या पुढे ADM च्या चौकापर्यंत रस्ता नागमोडी आहे आणि उतार आहे आणि
तिथून पुढे परत graduate hall पर्यंत थोडा उतार आहे. ह्या संपूर्ण रस्त्यावर
दुतर्फा ओळीने झाडे आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावर नेहमीच थोडी सावली असते
आणि हवेत थोडासा गारवा असतो. ह्या रस्त्यावरून मी नेहमीच रात्रीच्या चांदण्यात
फिरतो (एकटाच! - lab मधून परत येताना मोठ्यांदी गाणी म्हणत येतो :-p). ADM च्या
चौकात आलो तेव्हा आकाश अगदी काळंकुट्ट झालं होतं आणि मस्त वारा
सुटला होता. इतका छान वातावरण होतं. एखाद्या ट्रेक साठी अगदी सुयोग्य! मिलिंद इंगळेच्या "गारवा" गाण्याच्या आधी जसं वर्णन आहे अगदी तसं झालं हे.. तिथून भराभरा
चालत canteen ११ मधे शिरलो. तिथे mango lassi घेतली आणि graduate hall मधे रूमवर
आलो. दार उघडून आत शिरलो आणि जोराचा पाउस सुरु झाला. अगदी एका मिनिटाच्या फरकाने
वाचलो! आत्ता जवळजवळ पाऊन तास चालू होता जोरदार पाउस. मस्तपैकी mango lassi पीत माझ्या
आवडीचं गाणं (घन घन माला नभी दाटल्या) ऐकत खिडकीपाशी बसलो होतो एवढा वेळ!
Saturday, October 19, 2013
Friday, September 20, 2013
22. Pappu Can't Talk Sala!
This blog post is inspired by the "deeds" of a certain Pappu, who seems to be very favorite of the "free thinkers" and the "best journalists" in India. They keep on praising his fiascos as if those are his achievements! But the common youth of India certainly have their own opinions about him and I think this parody reflects these opinions.
Bonus: I am thinking of parody of another song - 'Papa Kehte Hain Bada Naam Karega'
You have seen its first two lines in this post. Will post it in a couple of days. :-D
Subscribe to:
Posts (Atom)