Monday, August 4, 2014

26. sher-o'-shayari

१.

भरी मेहफिल में बैठे होतें हैं हम
लेकिन दिल में आप के ही खयाल आतें हैं

लोग अपनी अपनी बातें करते हैं
हमारे कानों में तो आप की ही हंसी गूंजती है

कहीं बाहर गए तो लोग नज़ारे देखते हैं
हमारी आखों के सामने तो बस आप का ही चेहरा आता है

लोग केहते हैं की हम अपने आप में ही गूम रहते हैं
कैसे बताये किसी को की हम तो आप के नाम से झूमते रहते हैं!




२. Reply - एक आधुनिक कविता

gmail वर मी "Hi" म्हणाले
पण तू invisible झालास,
reply केला नाहीस..

whatsapp वर ping केलं
त्यानंतर dp आणि status बदललंस,
पण reply केला नाहीस..

facebook वर message केला
"seen" असं दिसतंय,
पण reply केला नाहीस..


friendship day चे ढीगभर messages केले होतेस ना,
मग आजच काय झालय?
का आज राखीपौर्णिमा म्हणून
reply केला नाहीस..

Thursday, May 1, 2014

25. 50 डॉलर्स अक्कलखाती जमा!



(ह्यातला बराचसा भाग हा concert मधे बसून लिहिलेला आहे. उर्वरित भाग आत्ता परत आल्यावर पूर्ण केला.)
ए. आर. रेहमानच्या concert ला student discount मिळाला म्हणून ५० डॉलर्स देऊन गेलो. भयंकर पचका झाला! निम्मी concert झाली आहे. ३-४ गाणी वगळता सगळी तमिळ गाणी आहेत. म्हणून पचका! आणि पैसे अक्कलखाती जमा कारण आम्ही असं गृहीत असं धरलं होतं कि हिंदी आणि तमिळ  दोन्ही भाषांमधली गाणी असतील, पण हिंदी थोडी जास्त असतील. पण आता माझं मत सांगायचं तर ह्या concert ला येणं हा शुद्ध गाढवपणा झाला.
      आता लोकं म्हणतील कि आधी चौकशी करून काय झालं होतं म्हणून, पण तेच ना.. थोडीफार चौकशी केली होती आणि असं कळालं होतं कि मुख्यत्वेकरून हिंदी गाणी असतील. असो आमचाच मूर्खपणा दुसरं काय!
      एक खटकलेली गोष्ट अशी कि त्याची अनेक गाणी हि २-३ भाषांमध्ये आहेत. एकच चाल, पण २-३ भाषांमधील बोल. (अर्थात बरचसं क्रेडीट गीतकारांना कि ते एका भाषेतल्या गाण्याची चाल ऐकून दुसऱ्या भाषेतल्या गाण्यासाठी बोल लिहितात!) तर मुद्दा असा कि तमिळ गाणे गाताना त्या गाण्याचं हिंदीमधील किमान एक कडवं (आणि अगदीच काही नाही तर किमान २ ओळी तरी) गाता आल्या असत्या , पण तसं झालं नाही! आमचा पोपट झाला!
      आता अजून एक मुद्दा असा कि लोकं म्हणतील कि गाणं कुठल्याही भाषेतला असो, नीट शांत बसून ऐकायला, enjoy करायला काय जातंय म्हणून.. असं नाही कि आम्ही सगळ्याच गोष्टींना नावं ठेवतोय.. काही गाणी (बोल काळात नसूनही) आम्ही enjoy केलीच.. पण जर बोल न कळणाऱ्या गाण्यांचा भडीमार व्हायला लागला तर मग काय ना.. आणि नुसतच संगीत ऐकायचं असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. एखाद्या गाण्याची मजा जास्त तेव्हा येते जेव्हा त्याचे बोल कळतात आणि अर्थ समजतो! म्हणूनच गदिमांच एखादं गाणं जर एखाद्या मराठी न कळणाऱ्या माणसाला ऐकवलं तर तो कंटाळणारच ना! त्या गाण्यातल्या भावना ह्या आपल्याला कळतात, त्याला त्या enjoy कशा करता येणार? आता हेच बघा, “जे वेड मजला लागले..” किंवा “राजहंस सांगतो..” किती सुंदर आहेत हि गाणी आणि किती छान बोल आहेत ह्या गाण्यांचे! नुसता गाणं ऐकायला पण छान वाटेल, पण एखादा माणूस त्या भावना नीट तेव्हाच समजू शकेल जेव्हा त्याला त्या गाण्याचा अर्थ समजेल, त्याला नळ-दमयंती कथेचा संदर्भ कळेल..! आणि समजा अशी नीट न कळणारी अनेक गाणी त्याला ऐकवली तर त्याची काय अवस्था होईल!
      तर सारांश हा कि आमचे पैसे अक्कलखाती जमा! स्वदेस, रांझणा, रॉकस्टार ह्या सिनेमांनी आणि ख्वाजा ने हात दिला म्हणून जरा बर! ARR concert अगदीच ARRRRR concert झाली..!
(जाता जाता २ गोष्टी. त्यातली दुसरी गोष्ट अशी कि आपल्याकडे लग्नात नवरी मुलगी किंवा ‘येत्या एक-दोन वर्षात कर्तव्य असलेली’ एखादी करवली जितक्या वेळा कपडे बदलत नाही त्यापेक्षा जास्त वेळा तो कपडे बदलत होता. अर्थात त्याला आमचा काहीच आक्षेप नाही. फक्त सांगितलं. आणि पहिली गोष्ट अशी कि आम्ही असं ऐकलं कि बऱ्याचश्या गाण्यांच्या वेळी तो लिप-सिंक करत होता!!!)  
        

Sunday, November 17, 2013

24.आमचा ब्लॉग: गेल्या एक वर्षातील लिखाणाचा आढावा




आमचा ब्लॉग: गेल्या एक वर्षातील लिखाणाचा आढावा

 सुमेध ढबू
 

Abstract


  आम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात केली त्याला आज तिथीनुसार (कार्तिकी पौर्णिमा) एक वर्ष झालं. त्यानिमित्त आजची हि post. ह्या post मध्ये आम्ही आमच्या मागच्या एक वर्षातील लिखाणाचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. (नेहमीप्रमाणेच शुद्धलेखनाच्या चुकांबाबत चूकभूल देणे घेणे.)

1. INTRODUCTION

तर आम्ही ब्लॉग लिहायला लागलो त्याला आज एक वर्ष झालं! मागच्या कार्तिकी पौर्णिमेला पहिली post टाकली होती. त्यानंतर अधून मधून काहीतरी लिहित राहिलो आणि आज बघता बघता एक वर्ष झालं पण! मधल्या काळात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं आहे. (अर्थात जाणारच म्हणा.. इथे सिंगापुरात सारखाच इतका पाउस पडतो कि पुलाखालून काय पुलावरूनसुद्धा भरपूर पाणी वाहून जाईल.. पण नाही जात! इथली गटारे फारच चांगली आहेत बुवा! असो..)    

2. MAIN TEXT

खरं सांगायचं तर आज तसं लिहीण्यासारखं विशेष काही नाहीये. पण ते एक वर्ष झाल्याचं काहीतरी दाखवायला पाहिजे ना, म्हणून हा लेखनप्रपंच! नाही म्हणायला अर्धवट लिहिलेल्या गोष्टींपैकी काहीतरी पूर्ण करू शकलो असतो. पण आत्ता बाहेर वातावरण असं आहे कि काहीच करायची इच्छा होत नाहीये. सुयोगच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या मांजरासारखं चारही तंगड्या वर कर करून लोळत पडावसं वाटतंय. :-D

इकडे (सिंगापुरी) आल्यानंतर सुरु केलेलं आमचं अनियतकालिक ‘सिंगापूर पत्रक’ वाचकांच्या पसंतीस पडल्यानंतर आम्ही हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तसे आम्ही आळशी असलो तरी गेल्या वर्षभरात आम्ही २३ posts टाकल्या आहेत! काही posts ह्या अश्याच मनात आलं म्हणून लिहिल्या होत्या, परिस्थितीजन्य होत्या, तर काही posts विशिष्ठ हेतूने. काही posts विनोदी होत्या, तर काही नव्हत्या. काही गद्य होत्या तर काही पद्य (कविता किंवा कवितेचे/गाण्याचे विडंबन) होत्या. बहुतांश posts मराठीमध्ये आहेत. पण ३-४ posts इतर भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) पण आहेत. थोडक्यात काय तर आम्ही आमच्या लिखाणात विविधता आणण्याचा थोडा थोडा प्रयत्न केला आहे. ठिकठिकाणी लिखाणाला जमेल तिथे वेगळा बाज आणायचा प्रयत्न केला आहे हे आमच्या चतुर, चाणाक्ष इत्यादी इत्यादी वाचकांच्या लक्षात आले असेलच! (आता हेच पहा.. हि post IEEE पेपर च्या formatting प्रमाणे लिहिली आहे..) आमच्या पहिल्याच post मध्ये आम्ही आमच्या ब्लॉगसंदर्भात स्वयंपाकाची उपमा वापरली होती. तीच उपमा पुढे न्यायची झाली तर आम्ही वेगवेगळ्या पाककृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणास त्या आवडतील अशी आशा आहे.

बाकी आमच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर विशेष काही नाही.. वर्षभरात अनेक नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. काही farewell झाली. भरपूर timepass केला. थोडंफार कामही केलं. इकडे दिवाळी साजरी केली. आमचा flat सोडून आम्ही सगळे आता पुन्हा होस्टेलमध्ये राहायला आलो आहोत त्यामुळे सध्या स्वयंपाक बंद आहे. बाकी आमच्या काही वाचकांना लौकरच प्रत्यक्ष भेटीनच! बाकीच्यांना इथेच नमस्कार!   

आता एवढं लिखाण बास झालं. आता pool खेळायला जायचं आहे. :-p :-D अर्थात मन मात्र आतून ओरडतय- “गाढवा! खेळायला काय जातोस. आजचाही दिवस वाया गेला. गेल्या २-३ दिवसात काहीच काम झालं नाहिये. नुसताच timepass!” पण माझ्या मना बन दगड! चल pool खेळायला!  

3. future work

सध्या काही काही गोष्टी अर्धवट लिहिलेल्या अवस्थेत आहेत. उदा: एका इंग्रजी गोष्टीचे रुपांतर करत होतो ते, एक विडंबन अश्या २-३ गोष्टी अर्धवट आहेत. मेघदूताच्या पहिल्या काही श्लोकांचा समश्लोकी भावानुवाद करून ब्लॉगवर टाकला होता, आता उर्वरित भागही पूर्ण करण्याचा विचार आहे. सध्या फारश्या प्रचलित नसलेल्या (पण पूर्वी सर्रास वापरल्या जाणाऱ्या) मराठी शब्दांची यादी करायला सुरुवात केली होती. ते काम पण करायचं आहे. आमच्या कंबोडिया तरीप बद्दलही लिहाव असा विचार चालू आहे. बघुयात कितपत लिखाण होतंय ते.


Acknowledgements

सर्व वाचकांना धन्यवाद! आमच्या पहिल्याच post ला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन लिहित राहून ब्लॉगवर टाकायाचा धीर झाला.

References

[१] आमचाच ब्लॉग!
(सगळीकडे आमच्या विविध posts चे क्रमांक द्यायचा मोह आवरला आहे. स्वतःच्याच ब्लॉगबद्दल स्वतःच किती लिहायचं ना.. जी काही थोडीफार लोकं वाचतात ती पण वाचणं बंद करतील.. :-p)