Friday, April 12, 2013

13. Gudhipadava Special Article - Novel Political Experiment!



Note: This is translation of my previous post. Original Marathi post can be found here: http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/04/12.html. I did it because some of my non-Marathi friends requested the translated version and many of my Marathi friends can’t read long articles in Devnagari. I have put the Marathi words in italics. I don’t know how to translate them! I have tried to convey the meaning wherever possible. I have tried to translate, hope this attempt is successful and conveys the meaning and intentions properly.

Shalivahan Shake 1935
Shuddha Pratipada
Gudhipadava

Wish you all a very Happy New Year! :-)

You all must have celebrated the Padava with ‘shreekhand-puri’ and other traditional dishes. Being away from home, I missed my regular program of helping mom in preparations for shreekhand and kadunimb chatani. Today (Thursday) evening I, along with my friends Sumit, Rohit and Akshay, went to ‘Shree Laxminarayan Temple’ in Little India. Before that I purchased shreekhand and rajgira vadi in Datar’s famous shop ‘Peshwai’. Then we went to a new hotel ‘Mumbai 2 Goa’, which had this offer of shreekhand-puri as complementary dish on every meal. So had shreekhand-puri on the occasion of Padava. :-) The hotel is ok ok – not many options for vegetarian people but the menu looks real good for seafood lovers.

Note to all relatives and friends in Pune: when you will visit Grahak Peth on the occasion of Ramnavami, take panhe and sunthavada on my behalf too! :-)

Now I will come to the main topic of this post.

I was actually not sure of what to write today, as all the stories of why to celebrate Padava and other related stories will already be there in newspapers. All those stereotype columns will have been published in every newspaper. All these articles regarding festivals and traditions are becoming like the ‘dekhave’ or decoration and plays during the Ganapati Festival (dekhava is a short theatrical play created with statues and is supposed to be source of entertainment, sometimes addressing the current situations or historical events). This mandal’s (group’s) dekhava can be seen at some other mandal next year and that mandal’s dekhava is put at some other mandal (of course some mandal’s are exception, e.g. Gavalivada mandal). Similar to this, recently it has been observed that the same articles with the same contents are being published in various newspapers with very minor changes. All the editors discuss the current affairs (of course the ones which won’t be politically unsuitable for their owners) and in almost every article one can notice the sentence ‘we all should come together and take initiative regarding - -’ (put some virtues and current affairs here).

We have this great tradition of ‘bomb marane’ (officially speaking ill words on the day of holi). This tradition has been incorporated in our great culture by our great ancestors to allow the otherwise civilized and good mannered people to have the ‘special drinks’ and then speak the way they want to without anyone judging them! Of course our - - political leaders do not fit this group (insert the adjectives honorable etc. etc. in place of - -). One (self-proclaimed ‘tagya’ - goon) political leader recently vomited some unspeakable words about drought affected people. This may be because his hangover from the day of holi is not over yet! The political history of Maharashtra has seen so many speeches with loads of censored contents of such bad levels (interested people can check the speeches of one of the late Marathi actors – the real Dada and a recently deceased great political leader – of course use headphones! These will be available on YouTube) that this specific speech was just the plain speech compared to them. But still the intention was so wrong. How you dare to mock the drought-affected people who expect some help from you (not because you are great or something but simply because you are in power and in position to help)? There is no water in dams, these political leaders say. How is it possible that there is no water only when it is required for farming and household purposes? Water is available for all other purposes – IPL, holi, constructions and palaces of rich and eminent people, wineries and other water exhaustive factories and activities of political leaders! We must ask these questions! What happened to all those multimillion projects for water harvesting? They are trying to suppress their wrongdoings and mismanagement with this issue (reference:  http://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-drought-manmade-analysis/article4577079.ece). There had been a multimillion project for artificial rains few years back. What happened afterwards? Of course the newspaper and TV channel people won’t say anything about this, because of the political and monetary relations of their owners!

Another main point is current MP of Pune! He has spent more time in courts and jail than he spent in his constitution! We should show such people their real place. The parliament elections will be held within a year now and we all should take them down from power. Whether the current MP will get another chance or not is not fixed yet. The ‘clock people’ might also push forward their candidate, but we should unite against them. The ‘clock’ is now dysfunctional and must be replaced! Other political parties are also not good but they are at least less bad.   

But what more can one say about the politicians! These people generally have their followers (goons), so one must be beware of them. The article by one of my friends describes the situation I described in the last two lines (Ameya Sawadkar: https://www.facebook.com/notes/ameya-sawadkar/of-saving-money-for-things-essential-for-living/10151340163946835).  

Being a true Punekar, it is my duty to give you all some advice after all this talk against these people. I have already written some articles which will give you some good laughs. Also in my second post I wrote a poem about historic person. But this time I want to advice you all and make an emotional call for the betterment of Pune!

So am telling you all what has been in mind for more than a year. According to me, currently there is only one person in Pune who can be a true leader and represent Pune. But it seems that he has taken voluntary retirement from politics. Some people might not approve of him because of his past unsuccessful affiliations with some political parties, but this person has very good experience of actual governance and he also had contested for MP elections as an independent candidate. He has written 'Aswastha Dashakachi Diary' and really cares for the society. I think there is no need to tell his name, his qualifications speak for him! Great orator; well educated; very famous and popular in youth he is! We need such a leader! If the people in Pune take initiative and do something, we may be able to change his mind. It is the need of time to end the tyranny of the current dada’s and bhai’s and have our own candidate for elections!  I am sure that many NGOs and other organizations will be ready to back him as he is the person with very good reputation. The common man and especially youth will surely support him. I will write a separate article about this sometime.

It is my wish that well educated, same minded, good people from Pune should come together and do something about this. We all rant about the current political situation on internet or privately, but now is the time for action! There are many non-political organizations in Pune. As a Punekar, I wish that all of them should come together, discard their agenda of remaining non-political and take initiative for betterment of Pune. Our Pune has always been the center for all the historical political activities and I wish that this time we should try this novel experiment for the upcoming elections and should be the pioneers of new revolution!


I expect all of you to think about this and spread these thoughts as much as possible!

Note: all the thoughts expressed here are personal and if similar thinking people come together and undertake something, I will be very glad.
-           
Sumedh Dhabu

रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥

12. 'पाडवा विशेष' : एक अभिनव राजकीय प्रयोग!


शालिवाहन शके १९३५, माहे चैत्र
तिथी शुद्ध प्रतिपदा
गुढीपाडवा

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!  
श्रीखंड-पुरी, कडूनिम्बाची चटणी आणि गाठीच्या हाराची पदके खाऊन सर्वांनी पाडवा साजरा केला असेलच.
मी मात्र चक्का गाळून श्रीखंड करणं, कडूनिंब आणणं, पाटा-वरवंट्यावर कडूनिंबाची चटणी करणं आणि पंचांग हि दरवर्षीची माझ्याकडची कामं 'miss' केली. आज संध्याकाळी मी, सुमित, अक्षय आणि रोहित 'श्री लक्ष्मीनारायण' देवळात गेलो. त्याआधी दातारांच्या 'पेशवाई' मध्ये श्रीखंड, राजगिरा वडी वगैरे खरेदी केली. मग 'Mumbai 2 Goa' नावाच्या हॉटेलात गेलो. शाकाहारी लोकांसाठी फारसे options नाहीयेत, पण ठीकठाक आहे. महत्वाच म्हणजे तिथे जेवणावर 'complementary dish' म्हणून मिळालेली श्रीखंड पुरी खाणे झाले.     
पुण्यामधील सर्व आप्तेष्टांना विनंती: आता रामनवमीला सर्वजण सालाबादप्रमाणे ग्राहक पेठेत जालच. तेव्हा रामाला माझा नमस्कार सांगा. माझ्या वाटचे पन्हे प्यावे आणि सुंठवडा घ्यावा. :-)

असो तर आता मुख्य विषयाकडे वळूयात!

खरं तर आज काय लिहाव असं वाटत होत. एक तर सर्व वर्तमानपत्रांमधून पाडव्याच्या गोष्टी वगैरे आल्या असतील. गुढी उभारणे, कडूनिंबाची पाने खाणे ह्याचे महत्व सांगणारे दर वर्षीचे तेच तेच लेखहि आले असतिल. हल्ली जस ह्या मंडळाचा देखावा पुढच्या वर्षी त्या मंडळाकडे असतो आणि त्या मंडळाचा देखावा आणखीन तिसऱ्या मंडळाकडे जातो (अपवाद - काही चांगली मंडळे. उदा: गवळीवाडा मंडळ); तसंच ह्या वर्तमानपत्रान्मधल्या लेखांचं असतं. तोच तोच मजकूर वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होतो. सर्व धुरंधर संपादक आपल्या अग्रलेखान्मधून महत्वाच्या घडामोडींचा उहापोह (अर्थातच त्यांच्या मालकांना ज्याचा त्रास होणार नाही अश्याच घडामोडी आणि अश्याच भाषेत!) करतात आणि बहुतांश लेखांमध्ये/ लेखांच्या शेवटी 'आपण सर्वांनी एकत्र येउन - - - ची गुढी उभारली पाहिजे' हे किंवा अश्या आशयाच वाक्य असतच! (इथे - - - च्या जागी काही सद्गुण, सामाजिक परिस्थितीशी निगडीत कार्ये ह्यांचा समावेश करावा).  

आपल्याकडे होळीच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आहे. काही सभ्य माणसे देखील होळीच्या दिवशी 'राजयोगी' होऊन (म्हणजे काही 'विशेष पेय' प्रश्न करून) अर्वाच्य भाषेत बोलतात. एरवी सभ्यपणे वागणाऱ्यानसाठी आपल्या थोर पूर्वजांनी आपल्या थोर संस्कृतीत हि सोय करून ठेवली आहे. परंतु आपले - - पुढारी ह्या संस्कृतीत बसत नाहीत (इथे - -  च्या जागी वर्तमानपत्रात येणाऱ्या विशेषणाचा समावेश करावा उदा; आदरणीय(?) वगैरे वगैरे). तर अश्याच एका (स्वघोषित) 'टग्या' पुढाऱ्याने नुकतीच गटारगंगा ओकली. त्यांची बहुतेक होळीच्या दिवशी घेतलेली अजूनही उतरली नसावी. किंवा रोजच राजकीय धुळवड चालू असल्याने अजूनही होळीच सुरु आहे असा गैरसमज होऊन सकाळी सकाळीच (बहुतेक पहिल्या धारेची) टाकून आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही अशी भाषा त्यांनी वापरली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला (?) अर्वाच्य शब्दांची रेलचेल असलेली भाषणे काही नवीन नाहीत (जिज्ञासूंनी दुसऱ्या एका दादाची - सुप्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेत्याची आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या महानेत्याची भाषणे ऐकावीत - headphones लावून! Youtube वर मुबलक संख्येने उपलब्ध असतील). त्यामानाने हि भाषा अगदीच साधी होति. पण ह्या वाक्यान्मागाची भावना मात्र अगदीच चुकीची होती. जी लोकं तुमच्याकडे (तुमची लायकी नसली तरी तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून) मदतीच्या आशेने बघताहेत त्यांची तुम्ही टर उडवता? धरणात पाणी नाही म्हणे. शेती आणि पिण्यासाठी सोडून इतर सगळ्या कामांसाठी पाणी कसं असतं धरणांमध्ये? आपण सगळ्यांनी एकत्र येउन हे प्रश्न ह्या मुजोर लोकांना विचारलेच पहिजेत. IPL साठी, होळी, रंगपंचमीसाठी, श्रीमन्तांच्या बंगले आणि इतर बांधकामांसाठी, राजकीय लोकांच्या wine आणि इतर पाणीखाऊ उद्योगांसाठी मात्र कसं पाणी असतं? गेलं कुठे पाणी? तुमच्या हजारो कोटींच्या योजनांच काय झाला? गेली अनेक वर्षे चालू असलेल्या योजनांमध्ये कुठे तरी पाणी मुरतंय का? तुमचा पैसेखाऊपणा आणि करंटेपणा तुम्ही दुष्काळाच्या नावाखाली झाकू पाहताय! तुम्हाला पाण्याच नियोजन करता येत नाही! (संदर्भ: http://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-drought-manmade-analysis/article4577079.ece). काही वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून कृत्रिम पाउस पाडण्याचे प्रयोग झाले होते. त्याचं पुढे काय झालं? ह्या सगळ्याबद्दल हे वर्तमानपत्रवाले काही बोलणार नाहीत! त्यांच्याच मालकांचे (राजकीय नि आर्थिक) हितसंबंध गुंतलेले असतात नं ह्यात!

दुसरा मुद्दा म्हणजे सध्याचे पुण्याचे खासदार! आपल्या मतदारसंघात घालवला नाही एवढा वेळ त्यांनी (आपल्या सुदैवाने) कोर्टात आणि तुरुंगात काढला! त्यांना देखील त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आता येतीलच तेव्हा ह्या अश्या निर्लज्ज लोकांना आपणच पाडलं पाहिजे. ह्यावेळी पुण्यातून कोण उभं राहील काही माहिती नाही. विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळेल किंवा नाही ते माहित नाही. तसेच काही सांगता येत नाही घड्याळवाले सुद्धा कदाचित त्यांचा उमेदवार उभा करतील. पण आपण मात्र ह्या लोकांना भाव देऊ नये. इतर राजकीय पक्ष देखील काही फारसे चांगले नाहियेत. अर्थात दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने ते जरा बरे आहेत एवढंच.

असो. राजकारणी लोकांबद्दल जास्त काय बोलणर. गुंड पोसणारे हे लोक. आमच्या एका सुविद्य मित्राने साधारणपणे ह्याच विषयावर लिहिलेला लेख बरेच काही सांगून जातो (अमेय सवडकर: https://www.facebook.com/notes/ameya-sawadkar/of-saving-money-for-things-essential-for-living/10151340163946835 ). ह्या लोकांना सत्तेवरून आपणच खाली ओढलं पाहिजे. एखादी वस्तू निरुपयोगी झाली कि आपण बदलतो, तसच आता हे घड्याळ निरुपयोगी आणि उपद्रवी झाल आहे. ते बदललच पाहिजे.

आता ह्या लोकांवर थोडफार तोंडसुख घेतल्यानंतर पक्का पुणेकर ह्या नात्याने मी इथे काही उपदेश करणं ओघानेच आलं. तसं पक्का पुणेकर म्हणून आम्ही पहिल्याच लेखात आणि नंतरही टाळ्या वसूल केल्या आहेतच. आमच्या दुसऱ्याच post मध्ये आम्ही इतिहासाची देखील आठवण करून दिली आहे. पण ह्यावेळी जरा अजून थोडा उपदेश आणि थोडं भावनिक आवाहन करण्याचं मनात आहे.

तर सुमारे वर्ष-दीड वर्ष आमच्या मनात असलेली गोष्ट आज आम्ही इथे सांगत आहोत. आमच्या मते सध्या पुण्याचे प्रतिनिधित्व करायला एकच लायक उमेदवार आहे. परंतु त्यांनी सध्या राजकीय संन्यास घेतला असावा असा वाटतंय. अर्थात काहीजण त्यांनी पूर्वी मारलेल्या राजकीय कोलांट्या-उड्यांमुळे नाक मुरडतील, पण त्या उमेदवाराला प्रशासकीय कामकाजाचा आणि निवडणुकीचा देखील अनुभव आहे. सुज्ञ जनास अधिक सांगणे न लगे! आपण ओळखलच असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते!  अमोघ वक्तृत्व, सुसंस्कृत, सुविचारी, तरुणांमध्ये प्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे. 'अस्वस्थ दशकाची डायरी' लिहिणाऱ्या ह्या माणसाला समाजाची चांगली जाण आहे. आज आपल्याला अश्याच नेतृत्वाची गरज आहे! आम्ही internet वरून बरीच बडबड आणि publicity करू शकतो पण पुण्यामध्ये असलेल्या तरुणांना आणि सर्वांनाच आमचे हे जाहीर आवाहन आहे कि आपण जर काही प्रयत्न केले तर आपण त्यांचे मन कदाचित वळवू शकू. आज जनतेनेच 'दादा'गिरी आणि 'भाई'गिरी संपवून आपला उमेदवार उभा करण्याची गरज आहे!  अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था देखील त्यांना पाठींबा देऊ शकतात कारण ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आणि विशेषत: तरुणांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरच असेल. ह्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सविस्तरपणे लिहूच! 

ह्या बाबतीत सुज्ञ, सुविद्य, विचारी अश्या पुणेकरांनी एकत्र येउन काहीतरी करावे अशी आमची इच्छा आहे. आपण सर्वजण internet वरून, इतर मार्गांनी किंवा खाजगीतही सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल असंतोष व्यक्त करतच असतो. पण आता मात्र कृतीची वेळ आली आहे. पुण्यात चांगली चांगली कामे करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटना आहेत. पुण्याचा भल्यासाठी सर्वांनी आपले हेवेदावे विसरून आणि बिगर-राजकीय राहण्याचे धोरण बाजूला ठेवून ह्याबाबत पुढाकार घ्यावा हीच एक पुणेकर तरुण म्हणून माझी इच्छा आहे! आपलं पुणं राजकीय मुत्सद्देगिरीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. तेव्हा हा एक अभिनव प्रयोग ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी करावा आणि एका नवीन क्रांतीची सुरुवात करावी अशी आमची इच्छा आहे! 

आमच्या ह्या आवाहनाचा वाचकांनी जरूर विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवावेत अशी आमची अपेक्षा आहे!

टीप: इथे व्यक्त केलेले विचार पूर्णत: वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. समविचारी लोक एकत्र आल्यास तसेच अश्याच प्रकारे इतर ठिकाणी देखील उमेदवार उभे केल्यास आम्हाला आनंदच होईल!

इति लेखनसीमा!
-
सुमेध ढबू

रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥